नागपूर -२०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत या वर्षीच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला अतिशय कमी जागा मिळाल्या. नागपूर जिल्ह्यात भाजप फक्त दोनच जागांवर विजय मिळवू शकला आहे. जिल्ह्यातील या धक्कादायक निकालामुळे भाजपचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजपचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ राजीव पोतदार यांनी दिला पदाचा राजीनामा हेही वाचा... घरच्या मैदानावर भाजपच्या तोंडाला फेस, नागपुरात १२ पैकी आघाडीने जिंकल्या ५ जागा
पराभवाची जबाबदारी स्विकारत पोतदार यांनी दिला राजीनामा
२०१४ च्या मोदी लाटेत देखील सावनेर मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील केदार निवडून आले होते. या वेळी सुनील केदार यांच्या विरोधात भाजपने जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांना रिंगणात उतरवले होते. मात्र भाजपला येथे पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा... नागपूर: बालेकिल्ल्यातच भाजपची पीछेहाट; अतिआत्मविश्वास नडल्याची चर्चा
भाजपच्या गडाला आघाडीकडून सुरूंग
विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. मात्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपच्या या गडाला सुरुंग लावला आहे. २०१४ ला जिल्ह्यात ११ जागेवर निवडणूक येणाऱ्या भाजपला यावेळी फक्त ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. नागपूर शहरातही काँग्रेसने दोन जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला आहे. नागपूर शहरातील पश्चिम आणि उत्तर मतदारसंघात तर ग्रामीणमध्ये सावनेर, उमरेड, काटोल आणि रामटेकमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे.