नागपूर - मागील अनेक दशकांपासून कुस्तीगीर परिषदेचे ( Wrestlers Council ) अध्यक्ष राहिलेले शरद पवार ( Sharad Pawar ) यांना कुस्ती संघटनांमध्ये पुन्हा धक्का बसला आहे. त्यांच्या अध्यक्षपदी असताना भारतीय कुस्तीगीर संघाने ( Indian Wrestling Federation ) स्पर्धा घेत नसल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ( Maharashtra Wrestlers Parishad ) बरखास्त केली होती. यानंतर नव्याने झालेल्या निवडणूक ( Wrestlers Council Election ) प्रक्रिया राबवत असताना बिनविरोध पार पडली आहे. अध्यक्षपदी भाजपचे खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
अध्यक्षपदी असलेल्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे खासदार रामदास तडस ( BJP MP Ramdas Tadas ) हे स्वतः कुस्तीगीर आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची निवड प्रक्रिया 28 जुलैला होणार आहे. यात भविष्यात ऑलिम्पिक खेळाडू घडवायचे असल्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच हा एकप्रकारे शरद पवार यांना धक्का सुद्धा मानला जात आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील वादामुळे बरखास्त - भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद हे भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांच्याकडे आहे. यातच आता भाजपचे खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यात शरद पवार हे मागील अनेक वर्षांपासून अध्यक्ष राहिले आहेत. यातच त्याचा कारभार सांभाळणारे बाबासाहेब लांडगे हे मागील 40 वर्षांपासून महाराष्ट्र्र कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदावर आहे. पण त्यांच्या कार्यकाळ हा वादग्रस्त राहिला आहे. अनेकदा इतर पदाधिकरी यांनी तक्रारी करून सुद्धा काहीच होत नसल्याने तसेच भारतीय कुस्तीगीर संघाने घ्यायला लावलेल्या स्पर्धाचे आयोजन होत नसल्याने कुस्तीगीर परिषदेचे काम ढेपाळले होते. तसेच अध्यक्ष असलेले शरद पवार हे लक्ष सुद्धा देऊ शकत नसल्याने परिणामतः भारतीय कुस्तीगीर संघाने करवाई करत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची बॉडी रद्द केली होती.
शरद पवार यांना एकप्रकारे धक्का -महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये नव्याने लागलेल्या निवडणुकीचा निकाल हा 31 जुलैला लागणार आहे. यासाठी 22 तारखेला नामांकन दाखल करण्यात आले होते. आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटची तारीख होती. मात्र, अध्यक्षपदासाठी नामांकन भरलेले 3 अर्जापैकी धावलसिंग मोहिते पाटील आणि काका पवार यांनी दोघांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे. यात अध्यक्षपद हे आपोआप भाजपचे खासदार तडस यांच्या पदरात पडले. पण हे होत असताना नक्कीच राजकीय खेळी झाली आहे. भविष्यातील नेतृत्व आणि राजाश्रय पाहता हे अध्यक्षपद खासदार तडस यांना देऊन सचिवपदी काका पवार तर कार्याध्यक्ष पद धवलसिंग मोहिते- पाटील यांना देण्यात आली. तसेच ही संपूर्ण निवडणूक बिनविरोध करून घेण्यात अध्यक्ष असलेली तसेच विदर्भ केसरी राहिलेले खासदार तडस यांना यश आले आहे.