नागपूर - नागपुरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने परिस्थिती पाहता पालकमंत्री नितीन राऊत यांनी 14 मार्चपर्यंत असणाऱ्या अंशतः लॉकडाऊनमध्ये बदल केला आहे. 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन कडक करत संचारबंदीची घोषणा केली. पण, हा निर्णय कोणालाचा विश्वासात न घेताच घेतल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केला. तसेच फसवे लॉकडाऊन म्हणत याला त्यांनी विरोध दर्शवला आहे.
हेही वाचा -बेळगावात शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नडिगांचा हल्ला, घटनास्थळी तणाव
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत हे काँग्रेसचे असले तरी मनपामध्ये भाजपची सत्ता आहे. यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असे राजकारण तापताना दिसून येत आहे. याला कडक लॉकडाऊन म्हणत आहे. पण वाहतुक सुरू आहे, पार्सल सुविधा सुरू आहे, कॉटन मार्केट सुरू आहे, मद्य विक्री सुरू आहे, ट्रान्सपोर्ट सुरू असणार आहे. ऑनलाईन जेवण मागावणे सुरू आहे. मग बंद काय आहे? असाही सवाल प्रवीण दटके यांनी केला.