महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ethanol from Bamboo : सहकारातून बांबू लागवडीला सहकार्य करा - केंद्रीय मंत्री अमित शहांकडे मागणी - Ethanol from Bamboo

1 टन उसासाठी 2 कोटी लिटर पाणी लागते. तर त्यापासून 80 लिटर इथेनॉल तयार होते. त्याउलट 1 टन बांबूसाठी 20 लाख लिटर पाणी लागत असून त्यापासून 400 लिटर इथेनॉल तयार होते. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊस शेतीऐवजी बांबूची शेती केली पाहिजे.

पाशा पटेल
पाशा पटेल

By

Published : Mar 27, 2022, 10:52 AM IST

नागपूर - येत्या 2030 पर्यंत फ्लेक्स इंजिन असलेले वाहन रस्त्यावर धावणार असल्याने इथेनॉलची मागणी वाढणार आहे. यासाठी बांबूपासून इथेनॉलची निर्मिती करून इंधनाची गरज भागवल्या जाऊ शकेल. पण यासाठी बांबू हे पीक सहकार क्षेत्रात घ्यावे, अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमितशाह यांना केली असल्याचे भाजपा नेते पाशा पटेल यांनी सांगितले. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सहकारातून बांबू लागवडीला सहकार्य करा

बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे तंत्र विकसित - पाशा पटेल म्हणाले, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी बांबूचे पीक सहकार क्षेत्रात घ्यावे. त्यासंदर्भात निर्णय झाले, तर बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकारी तत्वावर समूह तयार होऊन देशात इथेनॉल उत्पादनात क्रांती होईल असे मत व्यक्त केले आहे. उसाची मर्यादित उपलब्धता पाहता ऊसापासून इथेनॉल तयार करणे शक्य नाही. पण बांबू पासून इथेनॉल तयार करण्याचे तंत्र विकसित झाले आहे. त्यामुळे जर बांबूला सहकारात घेतले तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणारा बांबू मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन करू शकेल असे पाशा पटेल म्हणाले.

ऊसापेक्षा बांबू सरस - पाशा पटेल यांनी ऊस शेती आणि बांबू शेतीचा तुलनात्मक अभ्यास सांगितला. 1 टन उसासाठी 2 कोटी लिटर पाणी लागते. तर त्यापासून 80 लिटर इथेनॉल तयार होते. त्याउलट 1 टन बांबूसाठी 20 लाख लिटर पाणी लागत असून त्यापासून 400 लिटर इथेनॉल तयार होते. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊस शेतीऐवजी बांबूची शेती केली पाहिजे. या बांबु शेतीमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. इथेनॉलचे उत्पादनही अनेक पटींनी जास्त होते. त्यामुळे आम्ही ऊसाऐवजी बांबूची शिफारस करत आहे, असे पाशा पटेल म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details