नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील घरासमोर शुक्रवारी घडलेल्या घटनेमागे नागपूर कनेक्शन असल्याचा अतिशय गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. अमोल मिटकरी ( BJP leader Dharmapal Meshram comment on mla Amol Mitkari ) यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिटकरी यांनी केलेला आरोप गंभीर आहे, त्यामुळे भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर कनेक्शनचे पुरावे द्यावे, अन्यथा चौकशीला समोर जावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी केले.
अमोल मिटकरींनी नागपूर कनेक्शनचे पुरावे द्यावे, अन्यथा चौकशीला समोर जावे - भाजप नेते धर्मपाल मेश्राम - एसटी कर्मचारी आंदोलन मिटकरी प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील घरासमोर शुक्रवारी घडलेल्या घटनेमागे नागपूर कनेक्शन असल्याचा अतिशय गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. अमोल मिटकरी ( BJP leader Dharmapal Meshram comment on mla Amol Mitkari ) यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमोल मिटकरी यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा त्यांनी पोलीस चौकशीला सामोरे जावे अशी मागणी भाजप नेते धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. गेल्या 5 महिन्यांत एसटीच्या आंदोलनाकडे शरद पवार यांनी लक्ष दिले नाही. या दरम्यान १६४ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाची दयनीय स्थिती आहे. त्यामुळे, संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल आंदोलन केले. या घटनेनंतर त्यांनी विचार करावा, चिंतन करावे, अशी मागणीही धर्मपाल मेश्राम यांनी केली.
फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वाथ चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजिबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो.