महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हिंदू हृदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेने स्वीकारले आहे - भाजप नेते देवेंद्र फडणवीस - जनाब बाळासाहेब ठाकरे फडणवीस टीका

भाजपचा पराभव करण्याचा हा प्रयत्न आहे. जनता भाजपलाच निवडून देईल. युतीत शिवसेना काय करणार, हे पाहणे महत्वाचे राहील. सत्तेकरीता शिवसेना काय करते ते आम्ही पाहत आहोत. तसेही शिवसेनेने आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे, हे स्वीकारले आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis comment on shivsena
जनाब बाळासाहेब ठाकरे फडणवीस टीका

By

Published : Mar 19, 2022, 12:08 PM IST

Updated : Mar 19, 2022, 12:32 PM IST

नागपूर -एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपचा पराभव करण्याचा हा प्रयत्न आहे. जनता भाजपलाच निवडून देईल. युतीत शिवसेना काय करणार, हे पाहणे महत्वाचे राहील. सत्तेकरीता शिवसेना काय करते ते आम्ही पाहत आहोत. तसेही शिवसेनेने आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे, हे स्वीकारले आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

प्रतिक्रिया देताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस

हेही वाचा -'ईटीव्ही भारत'चा बातमीनंतर भाजप मैदानात; रिक्षा चालकाला न्याय देण्यासाठी अंधेरी आरटीओ समोर होणार आंदोलन

फडणवीस हे नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. एमआयएमने जरूर राष्ट्रवादीसोबत जावे, कारण ते सगळे शेवटी एकच आहे. भाजपला हरवण्यासाठी सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधान मोदींवर विश्वास असल्याने ते भाजपलाच निवडून देतील, असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

नवाब मलिक यांना बिनखात्याचे मंत्री केले आहे. संविधानिक पदावर असलेली व्यक्ती जेलमध्ये असताना पदावर राहणे हे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राजू शेट्टी यांच्या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. मुळातच राजू शेट्टी भाजपसोबत होते, पण काही कारणाने ते पलीकडे निघून गेले. कोण आमच्यासोबत येणार, कोण नाही, हे प्रत्यक्ष कळल्या शिवाय त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मात्र, जे कोणी शेतकरी नेते असतील त्यांनी जर मागच्या काळात मागे वळून पाहिले, तर सर्वाधिक काम शेतकर्‍यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले आहे. तसेच, साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने जे निर्णय घेतले तेवढे कोणीच करू शकले नाही. त्यामुळे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मात्र, अद्याप राजू शेट्टी यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -धक्कादायक : सरोगसीच्या नावावर दाम्पत्याची फसवणुक; डॉक्टरने नवजात मुलीला विकले 7 लाखांत

Last Updated : Mar 19, 2022, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details