नागपूर- महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचे नाही, महाराष्ट्रात ओबीसी जनतेची दिशाभूल करण्याचे काम या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण बोलले, मात्र खोटं बोल पण रेटून बोल आणि ओबीसींचा सत्यानाश कर, अशी भूमिका त्यांच्या बोलण्यातून दिसत असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते बुधवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 3 जुलै 2015 केंद्राला आरक्षणाच्या माहिती संदर्भात पत्र पाठवले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ओबीसीच्या इंपेरिकल डेटामध्ये 69 लाख चुका झाल्या होत्या. पण तरीही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे खोटे बोलत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. काँग्रेस, असो की राष्ट्रवादी खोटे बोलत आहे. ओबीसींना आरक्षण द्यायचे नसेल तर सांगा आणि दिशाभूल थांबवा, असा इशारा भाजपनेते बावनकुळे यांनी दिला आहे.
ओबीसींचा सत्यानाश करणे हेच महाविकास आघाडीचे धोरण - बावनकुळे - महाविकास आघाडीचे राजकारण
ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण बोलले, मात्र खोटं बोल पण रेटून बोल आणि ओबीसींचा सत्यानाश कर, अशी भूमिका त्यांच्या बोलण्यातून दिसत असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते बुधवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र 15 महिन्यात 15 वर्ष मागे नेला-
नाना पटोले म्हणतात स्वबळावर लढणार, असे असेल तर पाहिले सांगा, असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचं नेत्याच्या बैठकीत केला. पण यावर भाजपचे नेते बावनकुळे यांनी दोन्ही पक्ष नौटंकी करत असल्याचा आरोप केला. या पक्षाकडून राजकीय अजेंडा राबवला जात आहे. विकास कामाचे व्हिजन नाही, रोज नवे वक्तव्य करायचे, मग मागे घ्यायचे आणि जनतेची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे. पीक विमा, पीक कर्ज योजना राबवली जात नाही आहे. महाराष्ट्राच्या या महाविकास आघाडी सरकारने 15 महिन्यात महाराष्ट्राला 15 महिने मागे आणण्याचे काम केले आहे. हे सरकार मुंबई पुरते मर्यादित झाले आहे. अनेक महत्वाचे प्रश्न राज्यपुढे असताना कोणीही बोलत नाही .
हिम्मत असले तर धान घोटाळ्यावर सीबीआयची चौकशी करा-
नाना पटोले म्हणतात स्वबळावर लढून एक नंबरचा पक्ष म्हणून काँग्रेस उभी राहील, पण नाना पटोले यांनी विकासावर बोलावे. ज्या मतदारसंघातून ते येतात त्या धान उत्पादकांना बोनस दिला नाही, यावर बोलावे. शेतकरी पीक कर्ज भरू शकले नाही. कॉंग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हिम्मत असले तर गोंदिया भंडाऱ्यात झालेल्या एक हजार कोटीच्या धान घोटाळ्याची सीबीआय चौकशीची मागणी करावी, असेही आव्हान भाजपनेते बावनकुळे यांनी केले. राजकारण सोडून जनतेच्या मूळ प्रश्नांवर बोलावे असे बावनकुळेही म्हणाले.
सेनेत अनेक आमदार, खासदार नाराज-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहित आहे, त्यांच्या पक्षातील अनेक नेते नाराज आहे. पण मुख्यमंत्री पदावर बसायचे असल्याने त्याचे पक्षाकडे लक्ष नाही. निवडणुकीत खऱ्या अर्थाने कळेल की मुख्यमंत्री पद मिळाले पण पक्ष त्यातील लोक हातातून गेला असेल, असे वक्तव्य भाजपनेते बावनकुळे यांनी केले. सेनेचे प्रताप सरनाईक असो की आमदार आशिष जयस्वाल यांच्या प्रमाणे अनके जण नाराज आहे, असेही ते म्हणालेत.
मीडियामुळे झोटिंग समितीचा गहाळ अहवाल मिळाला-
झोटिंग समितीच्या अहवालावर गायब करून एकनाथ खडसे यांच्यावर गंडानंतर आणण्याचा प्रयत्न होता. त्यांना खडसेंना बळीचा बकरा करण्याचे काम केले होते. मात्र मीडियाच्या दबावानंतर बातमी झोटिंग समितीचा अहवाल पुन्हा मिळाल्याच समोर आले. यासाठी मीडियाचे आभार मानण्याचे काम त्यांनी केले आहे.