नागपूर - जिल्हा परिषदेतील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची चर्चा केवळ नागपूर जिल्हा आणि विदर्भापर्यंत मर्यादित राहिलेली नाही. तर या पराभवाचे फटाके मुंबईसह दिल्लीत देखील फुटले. भाजपने हा पराभव स्वीकारला आहे. तरीही त्यांच्याकडे या शिवाय दुसरा पर्याय सुद्धा नाही. जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपला आलेल्या अपयशाची कारणमीमांसा आमचे वरीष्ठ नेते करतील, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सांगितले जात आहे.
हेही वाचा.... जस्टीस लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी - गृहमंत्री अनिल देशमुख
राज्यातील इतर जिल्हा परिषदांपेक्षा नागपूर जिल्हा परिषदेचे निकाल हे भाजपला धक्का देणारे ठरले. जिल्ह्यात काँग्रेसने ५८ पैकी ३० जागा मिळवून एक हाती यश मिळवले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने आपला पराभव स्वीकारला असला, तरीही पराभवाच्या मुळ कारणांपासून मात्र भाजप नेते अजूनही दूर असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा... 'शेतकऱ्यांना कर्जमुक्ती बरोबरच चिंतामुक्तही करणार'