महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ड्रग्ज प्रकरणाचे षडयंत्र रचून भाजपने महाराष्ट्राला बदनाम केले -नाना पटोले - bjp against nana patole

ड्रग्ज प्रकरण हे भाजपचे षडयंत्र असून हे सगळे महाराष्ट्रला बदनाम करण्यासाठी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, यामध्ये ज्यांची नावे पुढे आलेली आहेत ते लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. मात्र, यातील वस्तुस्थिती एनसीबीने दाखवली नाही. परंतु, सत्य समोर येईल असही पटोले यावेळी म्हणाले आहेत. ते नागपूरमध्ये मांध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

By

Published : Oct 31, 2021, 7:46 AM IST

नागपूर - क्रूझवरील ड्रग्ज प्रकरण हे भाजपचे षडयंत्र असून हे सगळे महाराष्ट्रला बदनाम करण्यासाठी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, यामध्ये ज्यांची नावे पुढे आलेली आहेत ते लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. मात्र, यातील वस्तुस्थिती एनसीबीने दाखवली नाही. परंतु, सत्य समोर येईल असही पटोले यावेळी म्हणाले आहेत. ते नागपूरमध्ये मांध्यमांशी बोलत होते.

पत्रकारांशी बोलताना

50 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप

शाहरुख खानच्या पीएला जे लोक भेटले ते सर्व भाजपचेच कार्यकर्ते होते. त्यांचे मोबाईल चेक केले तर हे सगळेजण एकाच ठिकाणी आलेले असल्याचे स्पष्ट होईल. पण त्या बैठकीमध्ये केवळ 25 कोटींची मागणी नसून, आर्यन खानला बाहेर काढण्यासाठी शाहरुख खानला जवळपास 50 कोटीच्या खंडणीची मागणी झाल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी यावेळी केला आहे. हे सगळे राजकारण करून हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करून वातावरण खराब करण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

षडयंत्रातील पडद्यामागचे भाजपचे कलाकार पुढे आणावे

शासनाने याची चौकशी केली पाहिजे, गोस्वामी असो की सुनील पाटील नावाचा व्यक्ती असो ज्यांचे नावं अजून पुढे आले नाही, त्यांच्यावर तातडीने करवाई झाली पाहिजे. त्यासाठी अधिवेशननाची वाट पाहायची गरज नाही, असही पटोले म्हणाले आहेत. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. तसेच, या षड्यंत्रात पडद्यामागचे भाजपचे कलाकार होते ते पुढे आले पाहिजेत अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

उगाच वकिली करून नये, मुंद्रा पोर्टवार बोलावे

समीर वानखेडे, आर्यन खान यांच्या प्रश्नापासून जर वेळ मिळाला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असा टीका विनायक मेटे यांनी केली. त्यावर उत्तर देताना पटोले म्हणाले, की सातत्याने शेतकऱ्यांना मदतीची भूमिका कॉंग्रेस पक्षाची राहिलेली आहे. दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले असून ते वाटपही सुरू आहे. मात्र, असे वक्तव्य करून कोणाची वकिली करण्यापेक्षा मुंद्रा पोर्ट कोणाचा आहे त्याचा उल्लेख करावा असा पलटवार त्यांनी मेटेच्या टिकेवर केला. तसेच, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हे मुंद्रा पोर्टवरून आली आहे. या ड्रग्जच्या आहारी जाऊन तरुण पिढीला व्यसनाधीन करून आयुष्य उध्वस्त करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

गेल्या वर्षभरापासून तीन काळ्या कायद्याच्या विरोधात शेतकरी बसले असून त्याकडे लक्ष द्यायला भाजपला वेळ नाही. त्यामुळे या राजकारणाचा मला पडायचं नाही. मात्र, त्या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे. हे देश चालवण्यात पंतप्रधान यांना रस नाही, त्यामुळे त्यांच्याकडून फारशी अपेक्षा देह हिताच्या निर्णयासंदर्भात करता येत नाही असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा -भाजप नेत्याने आदिवासी महिलेला डांबून ठेवले होते, मंत्री नवाब मलिक यांचा नवा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details