महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर: महापौरांच्या आवाहनाकडे भाजप नगरसेवकांचा काणा डोळा

बुके, हार आणि सत्कार न करता ती मदत महापौर सहाय्यता निधीमध्ये जमा करा, असे आवाहन नागपूर महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौरांनी केले आहे. परंतु,  जनतेला आवाहन करणाऱ्या महापौरांच्या सुचनांकडे भाजपचे नगरसेवक मात्र दुर्लक्ष करत आहेत.

nagpur
municipal corporation

By

Published : Dec 27, 2019, 1:02 PM IST

Updated : Dec 27, 2019, 5:05 PM IST

नागपूर- राज्यात ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बुके, हार आणि सत्कार न करता ती मदत महापौर सहाय्यता निधीमध्ये जमा करा, असे आवाहन महापौरांनी केले आहे. परंतु, जनतेला आवाहन करणाऱ्या महापौरांच्या सुचनांकडे भाजपचे नगरसेवक मात्र दुर्लक्ष करत आहेत.

महापौरांच्या आवाहनाकडे भाजप नगरसेवकांचा काणा डोळा

हेही वाचा-'व्यायाम करा, धान्य दळा', दिल्लीमध्ये अनोख्या पिठाच्या गिरणीचा शोध

महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी पदभार स्वीकारताच महापौर सहाय्यता निधीचा उपक्रम सुरू केला. महापौरांनी लावलेल्या फलकापासून १०० मीटर अंतरावरच नगरसेवकांनी त्यांच्या पदभार कार्यक्रमासाठी फुलाहारांनी त्यांचे कार्यालय सजवले आहे. महापौरांनी केलेल्या आवाहनाला भाजप नगरसेवकच केराची टोपली दाखवत आहेत. नगरसेवकांनी ही सजावट केली नसून उत्साही कार्यकर्त्यांनी हे केले आहे. त्यांना आम्ही समज देऊ, असे महापौरांनी सांगितले आहे.

Last Updated : Dec 27, 2019, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details