नागपूरशिवसेना पक्षात उभी फूट (split in ShivSena party) पडल्यानंतर राज्यात सत्तांतर घडलं. त्यानंतर अजूनही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला (uddhav thackeray) हादरे बसतचं आहेत. आज अमरावती येथील शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश वानखेडे (rajesh wankhede) यांच्यासह वीस प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश (shivsena workers join bjp) केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bavankule) यांच्या उपस्थितीत नागपूर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात पक्ष प्रवेश संपन्न झाला. येत्या काळात मोठ्या प्रमाणात शिवसेनेसह अनेक पक्षांचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा देखील बावनकुळे यांनी केलेला आहे. 2024 च्या निवडणुकीत शिवसेनेकडे उमेदवारचं शिल्लक राहणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अमरावती जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार जिल्ह्यातील पुर्ण शिवसेना आज भारतीय जनता पक्षात सहभागी झाली आहे. राजेश वानखेडे यांच्या नेतृत्वात अपक्ष प्रवेश झाला आहे. राजेश वानखेडे हे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल 66 हजार मतं घेऊन प्रस्थापितांना घाम फोडला होता. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टीने अमरावतीत भाजपने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे.