नागपूर -भाजपा नक्कीच येत्या काळात महाराष्ट्रात वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीवर बोलताना व्यक्त केला ओबीसीच्या प्रश्नावर सातत्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरक्षणाचा लढा दिला ओबीसी आरक्षण परत मिळवण्याकरता प्रयत्नाची शर्त त्यांनी केली ओबीसी समाजाचा चेहरा आहेच पण तसाही भाजप हा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण अथवा मुंबई सर्व भागात मोठा पक्ष आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं ते नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत bjp big party in kokan mumbai say dcm devendra fadnavis होते
कोकण, मुंबईत भाजपा मोठा पक्ष आहे, असा टोला शिवसेनेला लगावत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून एक लहान कार्यकर्ता म्हणून भाजपच्या पक्ष वाढवण्यास मोठी कामगिरी केली ते सातत्याने भाजप पक्षासोबत राहिले त्यांनी पक्षाचे महामंत्री असो की राज्याचे ऊर्जामंत्री यासारखी महत्त्वाची पदं भूषवली अनेक महत्त्वाचा पदावर काम करताना पक्षाने जी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली