नागपूर - शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्त भारत बंदच्या आवाहनाला उपराजधानी नागपुरात फार काही प्रतिसाद मिळताना दिसून आला नाही. शहरात सीताबर्डी बाजारपेठ पूर्णतः सुरू असताना व्हेरायटी चौकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून धरणे देण्यात आले. मोदी सरकारच्या शेतकरी धोरणाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टीसह अन्य संघटनांनी एकत्रितपने धरणे देत नारेबाजी केली.
माहिती देताना राजकीय पक्षाचे नेते हेही वाचा -नागपूरमध्ये काँग्रेसकडून दोन सदस्यीय ठराव मंजूर, कार्यकर्त्यांमधून होणाऱ्या विरोधामुळे घेतला निर्णय
दिल्लीत अनके महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांचा विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या बंदला समर्थन देत नागरिकांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. पण नागपूर शहरतील मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या सीताबर्डी परिसरात जवळपास सर्वच दुकाने खुली होती.
हातात फलक घेऊन केले निदर्शने
यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, तसेच आम आदमी पार्टी, सिटूच्या नेत्यांनी एकत्रितपणे धरणे देत हातात फलक घेऊ शेतकरी कायद्यांचा विरोध केला. काळे कायदे मागे घ्या, असे फलक घेऊन तते लक्ष वेधत होते. त्यानंतर त्यांनी व्हेरायटी चौकात व्यापारी वर्गाची दुकाने सुरू असल्याने त्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. जोपर्यंत दुकाने बंद होत नव्हती तोंपर्यंत पक्षाचे झेंडे घेऊन नेते व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे सांगताना दिसून आले. मात्र, पुढे जात नाही तर पुन्हा दुकाने खुले केल्याचे चित्र होते.
लोकांना जबरदस्ती नव्हती
काँग्रेसच्या वतीने ब्लॉक स्तरावर नागरिकांना आवाहन केले जात आहे. नागरिकांनी एक दिवसाच्या संपात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनांना बळ देण्याचे आवाहन करत आहोत. लोकांना त्रास होऊ नये यासाठी केवळ हात जोडून आम्ही विनंती करत असल्याचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले. तेच राष्ट्रवादीचे नेते धुनेश्वर पेठे यांनी मोदी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे, असे सांगितले.
भारत बंदच्या आवाहनासाठी आंदोलनात सहभागी झालेल्या आम आदमी पार्टीच्या टोपी घालून असलेल्या महिला उघडी असलेल्या दुकानांतून काही खरेदी करण्याचा मोह आवरू शकल्या नाही.
आम आदमी पार्टीच्या टोपी घालून असलेल्या महिला हेही वाचा -खाजगी कंपनीच्या चुकांमुळे परीक्षा रद्द; नागपुरात परीक्षार्थ्यांनी केले निषेध आंदोलन