नागपूर - नागरिकता संशोधन कायदा आणि एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चा तर्फे आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. याला राज्यभरातून जवळपास 150 मुस्लीम संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जमियत उलमा या मुस्लीम संघटनेने निदर्शने केली आहेत.
'भारत बंद' च्या पार्श्वभूमीवर जमियत उलमा संघटनेची निदर्शने - muslim group agitates in nagpur
सीएए आणि एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंद चे आंदोलन करण्यात आले आहे. या बंदला राज्यभरातून जवळपास 150 मुस्लीम संघटनांनी पाठिंबा दर्शवला.
'भारत बंद' च्या पार्श्वभूमीवर जमियत उलमा संघटनेची निदर्शने
यामध्ये सहभागी होण्यासाठी व्यापारी वर्गाला आवाहन करण्यात आले. परंतु अद्याप या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे चित्र नाही. दुकाने बाजारपेठ आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी तसेच इतरत्र देखील पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.