नागपूर : 34 वर्षे संघाच्या(RSS) विचारधारेनुसार काम केल्यानंतर पक्ष सोडताना वाईट वाटत आहेत. ज्या भाजपला(BJP) वाढवण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतले. अनेक नवीन लोकांना पक्षात आणले. त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला डावलण्यात आले, माझा अपमान झाला. त्यामुळेच त्यामुळेच पक्ष सोडण्याचा(Ravindra Bhoyar Left BJP) निर्णय घेतल्याचे रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी सांगितले. त्यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. काँग्रेस पक्षाकडून अद्यापही विधान परिषदेची उमेदवारी देणार असल्याचे सांगितले आहे. मी भाजपकडे विधान परिषदेची उमेदवारी मागितली होती. पक्षात काम करताना तिकीट मागणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. त्यात गैर काहीच नाही. मी तिकिट मागितले नसते तर तो मृतपणा दिसला असता. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक वेळेला मी या निवडणुकीत उभा राहणार नाही असेच सांगितले होते. पण अखेर त्यांना उमेदवारी जाहीर झाली. दोन वर्षांपूर्वी ज्या कारणामुळे शेवटच्या क्षणापर्यंत भाजपने बावनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली त्याचे काय झाले? याचा खुलासा पक्षाने केला पाहिजे. बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्याचे काय कारण होते. आजच्या घडीला त्यांना उमेदवारी जाहीर झाली म्हणजे ती सर्व कारणे नाहीशी झाली आहे का? याचे स्पष्टीकरण भाजप नेतृत्वाने दिल पाहिजे असे भोयर म्हणाले.
पक्षाकडून अपमानास्पद वागणूक