नागपूर -स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आगळ्या ( Azadi Ka Amrit Mahotsav ) वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी नागपुरच्या 75 विद्यार्थिनींनी धावत्या मेट्रोत 75 मिनिटे 75 चित्र रेखाटून ( student drew colors of freedom in a running metro ) त्यात स्वातंत्र्यउत्सवाचे रंग भरले आहेत. विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये भरलेले रंग म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी केलेला त्याग, बलिदान आणि समर्पण दर्शवतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या वीर योध्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी स्वतःचे जीवन समर्पित केले अशा सर्व शूर वीरांना या विद्यार्थिनींनी चित्र आणि रंगाच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.
धावत्या मेट्रोमध्ये चित्र रेखाटून त्यात स्वातंत्र्याचे रंग भरून या वेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया ही संकल्पना शाळेच्या शिक्षकांनी आर्टच्या विद्यार्थिनी समोर मांडली. त्यावेळी विद्यार्थिनींना उत्साह बघण्यासारखा होता. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवा निमित्त साजरा होत असलेल्या उत्सवात भाग घेण्याची मोठी संधी मिळाल्यामुळे मन गौरवीत झाल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली आहे.