नागपूर - अयोध्या येथे सुरू असलेल्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्याने नागपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात ठिकठिकाणी महाआरतीचे आयोजन करून आनंदोत्सव साजरा केला जात आहे, तर काही ठिकाणी लाडू वाटून जल्लोष केला जात आहे.
अयोध्या राम मंदिर भूमिपूजन : नागपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण - नागपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण
आज अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन होत असल्यामुळे नागपुरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी लाडू वाटून जल्लोष केला जात आहे.
अयोध्या राम मंदिर भूमिपूजन
राम मंदिराच्या लढ्यात शेकडो कारसेवकांनी प्राणाची आहुती दिली आहे. आज त्या सर्वांना स्मरण करण्याचा ऐतिहासिक दिवस असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश व्यास यांनी व्यक्त केले आहे. राम जन्मभूमी आंदोलनाचे केंद्र बिंदू राहिलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाकडून आज महाल परिसरातील बडकस चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो किलोचे लाडू वाटण्यात आले. दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.