नागपूर - विभागातील बंधपत्रित अधिपरिचरिकांच्या सेवा समस्यांसंदर्भात विधानभवन, मुंबई येथे एक बैठक विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित केली होती. या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम) अंतर्गत सेवा बजावलेल्या बंधपत्रित अधिपरिचारिकांना यापुढील शासकीय सेवेतील भरतीप्रसंगी प्राधान्याने सेवेत सामावून घेण्यात यावे. कोविड-19 महामारी तसेच अन्य आरोग्य सुविधांच्या बाबतीत अधिपरिचारिकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. बंधपत्रित अधिपरिचारिकांपैकी अनेकांनी शासकीय सेवेतील प्रवेशाची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यांना अचानक सेवेतून कमी करणे उचित नाही, यादृष्टीने सहानुभूतीपूर्वक धोरण आखणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.
'बंधपत्रित अधिपरिचारिकांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे' - कोरोना परिचारिका
कोविड-19 महामारी तसेच अन्य आरोग्य सुविधांच्या बाबतीत अधिपरिचारिकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. बंधपत्रित अधिपरिचारिकांपैकी अनेकांनी शासकीय सेवेतील प्रवेशाची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यांना अचानक सेवेतून कमी करणे उचित नाही, यादृष्टीने सहानुभूतीपूर्वक धोरण आखणे आवश्यक असून त्याबाबतची कार्यवाही व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीस राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त श्री. अनुपकुमार यादव व संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होता. राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये या अधिपरिचारिकांना सेवेत कायम करण्यात आले तर काही जिल्ह्यांमध्ये असे झाले नाही. ही उणीव दूर व्हावी आणि नागपूर विभागात भंडारा, गोंदिया जिल्ह्यात यापुढील भरतीप्रसंगी अशा अधिपरिचारिकांना प्राधान्याने कायम करण्यात यावे, असे निर्देश पटोले यांनी दिले. या आदेशामुळे नागपूर विभागातील अधिपरिचारिकांसाठी एक नवीन आशा निर्माण झाली असून पटोले यांच्या आदेशानुसार भरतीप्रसंगी त्यांना प्राधान्य देण्यात आल्यास सरकारी नोकरी मिळवण्याच्या बऱ्याच वर्षांच्या संघर्षाला यश मिळेल.