महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूरच्या अजनीत पुन्हा खुनी संघर्ष; दोघे गंभीर जखमी - Assault on Nishant Bhagat

शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विश्वकर्मा नगर येथे दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पाच आरोपींनी मिळून केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Aug 12, 2021, 4:46 AM IST

नागपूर -शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विश्वकर्मा नगर येथे दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पाच आरोपींनी मिळून केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा -अरुण गवळीला २८ दिवसांचा पॅरोल मंजूर

राकेश सुरेश कुदेशी (वय ३०) आणि निशांत भिमराव भगत (वय २८) अशी जखमींची नावे आहेत, तर बिरजू कवेटीया, लखन कवेटीया, राम, संतोष, करण अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नागपूर शहराचे अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे विभाग नविनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आणि आरोपी हे एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचे रुपांतर आज खुनी संघर्षात झाले. दोन्ही जखमींची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांच्या डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. घटनेची माहिती समजताच अजनी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, ज्यामुळे पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली

गेल्या काही दिवसांपासून अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढल्याचे निदर्शनात येत आहे. १५ दिवसांपूर्वी स्वयंदीप नामक तरुणाचा खून करणाऱ्या शक्तिमान नामक गुंडाचा खून करण्यात आला होता. वारंवार अशा घटना घडत असल्याने अजनी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा -विदर्भवाद्यांनी सरकार मेले म्हणत केले मुंडन; पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांना वाहिली श्रद्धांजली

ABOUT THE AUTHOR

...view details