नागपूर - काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. परिषदेत त्यांनी कर्नाटकमधील आमदारांचा राजीनामा प्रकरण आणि वंचित बहुजन आघाडीबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली.
अशोक चव्हाण म्हणाले, भाजप संपूर्ण देशात फोडाफोडीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटकमध्ये सुरू आहे ते योग्य नाही. भाजपने देशाच्या लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रयत्न केला आहे. निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. त्यांची ही भूमिका योग्य नाही. भाजपकडून चाललेल्या या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी काँग्रेसने एकजुटीने राहायला पाहिजे. काँग्रेसकडून भाजपला चोख उत्तर दिले जाईल.