नागपूर -शिवसेना सत्तेत असताना देखील शिवसेना कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यात आम्ही अपयशी ठरत होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाला भेटत नव्हते. त्यामुळे आम्हाला आमच्या व्यथा मांडता येत नव्हत्या. त्यामुळे संतापाचा उद्रेक झाल्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन झाले, असे मत आशिष जैस्वाल ( MLA Ashish Jaiswal ) यांनी व्यक्त केले आहे.
Ashish Jaiswal On Shivsena : काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचा श्वास गुदमरला - आशिष जैस्वाल - MLA Ashish Jaiswal
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजप ( BJP ) आणि शिवसेनेला ( Shivsena ) आशीर्वाद दिला होता. मात्र, शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने जनदेशाचा अपमान करत जनतेने नाकारलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी अनपेक्षितरित्या घडलेल्या घडामोडीमुळे हिंदुत्ववाचा पुरस्कार करणारे सर्व आमदार दुखावले गेले होते. खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच शिवसेनेचा श्वास गुदमरायला सुरुवात झाली होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे बंडखोर गटाचे आमदार आशिष जैस्वाल ( MLA Ashish Jaiswal ) यांनी. ते आज १६ दिवसांनंतर स्वगृही नागपूरला पोहचल्यावर ईटीव्ही भारतशी बोलत होते.
आम्हीचं अधिकृत गट -मंत्री पदाच्या शर्यतीत आशिष जैस्वाल यांचे देखील नाव पुढे आले आहे. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की पक्ष मला जो न्याय देईल तो मला मान्य असेल. २०१९ च्या निकालानंतर शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची सर्वानुमते निवड झाली होती. पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे आमचा गट अधिकृत असल्याचा दावा आशिष जैस्वाल यांनी केला आहे.
हेही वाचा -Chandrasekhar Guruji: प्रसिद्ध ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांची हत्या; वाचा, कोण होते चंद्रशेखर गुरुजी