नागपूर -काँग्रेसने उत्तर प्रदेशचे इम्रान प्रतापगडी यांनामहाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल अंतर्गत नाराजी समोर येऊ लागली आहे. यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाहेरचा उमेदवार ( Rajya Sabha candidate ) दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता काँग्रेस प्रदेश महासचिव ( Congress State General Secretary post ) असलेले माजी आमदार आशिष देशमुख ( Ashish Deshmukh will resign ) यांनी नाराजी व्यक्त केली असून ते काँग्रेस प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा ( Ashish Deshmukh resign news Nagpur ) देणार आहे.
हेही वाचा -Nagpur Crime : गोळीबार झालेल्या शेख शकीलची तब्येत धोक्याबाहेर, एक संशयित आरोपी ताब्यात
महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये अनके कर्तबगार नेते असताना एका शायरला राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे, सर्वच स्तरावर नाराजी व्यक्त होत आहे. प्रतापगडी यांचा 2019च्या लोकसभेत 6 लाख मतांनी दारूण पराभव झाला होता. असे असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे, काँग्रेस पक्षाकडून घेतलेल्या निर्णयाचा विरोध म्हणून राजीनामा देणार असल्याचे आशीष देशमुख यांनी सांगितले. स्थानिक नेते असताना बाहेरच्या व्यक्तीला संधी देऊन महाराष्ट्रात आणखी काँग्रेसची परिस्थिती खराब होणार आहे, असेही आशिष देशमुख म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मला योग्य वेळी लक्ष ठेवू, असे आश्वस्त केले होते. त्यामुळे, यावेळी संधी मिळेल अशी आशा होती. पण राज्यातील व्यक्तीला बाजूला सारून दुसऱ्या राज्यातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे. पदाचा राजीनामा देणार, पण पक्षासाठी काम करत राहील. नाराजी ही पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचणार आहे, त्यामुळे पुढच्या काळात चांगल्या लोकांना उमेदवारी मिळेल, अशी आशा आशिष देशमुख यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -UPSC Exam Result : शिक्षणाने माणूस ताकदवर बनतो, शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा