नागपूर -कोरोनाच्या संकटामुळे काम बंद झाल्याने आर्थिक संकटाला कंटाळून एका कलाकाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे फेसबुकवर लाईव्ह जात शनिवारी सायंकाळी स्वतःला जखमी करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने कर्जबाजारीपणा आणि काम नसल्याने नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. प्रवीण मुन असे व्यक्तीचे नाव असून तो गायक आहे. दोन दिवसांपूर्वी मनपामध्ये महापौर यांच्या दालनासमोर केलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता.
हे ही वाचा - महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा उद्योग, विधानसभेचा उपयोग अंबानी कुटुंबासाठी - नाना पटोले
काम बंद असल्याने जगावे कसे यासाठी केले आंदोलन -
नागपुरात कोरोनाचे संकट भेडसावत असताना लग्न समारंभावर, सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अनेक कालाकारांना काम मिळत नसल्याने त्यांनी बेरोजगारीचा प्रश्न मांडण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या दालनासमोर आंदोलन करत आपली व्यथा मांडली. यावेळी प्रवीण मुन सह अन्य कलाकार मंडळींनी यात सहभाग घेतला होता.