नागपूर -पदवीधर निवडणूक मतदान प्रक्रिया राज्यातील सर्वच जिल्ह्यात पार पडली आहे. यात नागपूर विभागाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार पदवीधर निवडणुकीत अंदाजे ५५% मतदान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी ही आकडेवारी रात्री उशीरापर्यत वाढू शकते. असेही संबंधित विभागाकडून सांगण्यात येत आहे. या निवडणूकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहिर होणार असून विभागातील एकूण १९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
नागपूर जिल्ह्यात दोन दिग्गज नेत्यांमधे लढत-
सर्वच अंगाने महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पदवीधर निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया अखेर आज सायंकाळी समाप्त झाली आहे. त्यामुळे नागपूर विभागातील सगळ्याच उमेदवारांना आता निकालाची धाकधूक लागली आहे. विभागात एकूण २ लाख ६ हजार ४५४ इतकी अधिकृत मतदारांची संख्या आहे. यापैकी सर्वाधिक मतदारांची संख्या ही नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर जिल्ह्यात दोन दिग्गज नेत्यांमधे लढत होत आहे. कॉंग्रेसकडून अभिजीत वंजारी तर भाजपाकडून संदिप जोशी हे उमेदवार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान कोणाला मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मतदान प्रक्रिया ही अत्यंत सुरळीत-