महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mahaparinirvan Day : 'ओमायक्रॉन’ पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या (Mahaparinirvan day) पार्श्वभूमीवर सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

By

Published : Dec 5, 2021, 4:33 PM IST

Mahiparinivan day
दीक्षाभूमी

नागपूर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाचा (Mahaparinirvan day) कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून आयोजित करण्याच्या सूचना तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये “ओमायक्रॉन” ही (Omicron Variant) नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये व रहिवाशांमध्ये तीव्रतेने पसरतो. जास्त गर्दी होणाऱ्या ठिकाणी कार्य टाळणे अपरिहार्य आहे. कोविड 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


यावर्षी घरूनच अभिवादन करा
महापरिनिर्वाण दिन हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेला धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांनी दिक्षाभूमी येथे न येता घरी राहूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे.

दीक्षाभूमीवर येणाऱ्यांचे लसीकरण
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दिक्षाभूमी येथे शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जे व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिक्षाभूमी येथे अभिवादन करतांना येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. तसेच भाविकांचे शरीराचे तापमानही तपासण्यात येतील. ज्यांचे तापमान सामान्य असतील त्यांनाच कार्यक्रमात उपस्थित राहता येतील.
हेही वाचा -Prakash Ambedkar on Mahaparinirvan Diwas : आंबेडकरी अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येऊ नये - प्रकाश आंबेडकर

ABOUT THE AUTHOR

...view details