नागपूर -जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होईल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्पर्धेत नागपूर करता अनिल देशमुख, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार सारखे दिग्गज नेते असल्याने पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे अद्याप स्पष्ट नाही. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर किव्हा गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.
पालकमंत्री म्हणून पक्ष ज्या जिल्ह्याची जबाबदारी देईल त्यासाठी मी तयार - अनिल देशमुख - News about Guardian Minister
जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होईल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर किंवा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारण्याची तयारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर्शवली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तरानंतर खाते वाटप करताना तीनही पक्षांनी कमालीची खबरदारी घेतल्यानंतर सुद्धा आवडीचे मंत्रीपद मिळाले नसल्याने महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मंत्र्यांना राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करायचे आहे. त्यावेळी सुद्धा नाराजी नाट्य रंगण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा कस लागणार हे स्पष्टच झाले आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा पालकमंत्री पद ज्याला मिळेल त्याचे राजकीय वजन वाढत असल्याने या स्पर्धेत गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत सह विजय वडेट्टीवार आणि सुनील केदार सारखे दिग्गज नेते आहेत. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर आर पाटील ज्यावेळी गृहमंत्री होते, त्यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे मागून घेतले होते, असे सांगून तुम्ही देखील त्यांचा आदर्श ठेऊन गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद मागणार आहात का?, असे विचारले असता ते म्हणाले मला गडचिरोली, नागपूर किव्हा कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी दिल्यास मी ती स्वीकारण्यास तयार आहे.