नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संपूर्ण राज्यातील प्रचाराची धुरा आहे. यामुळे राज्यभर चालू असलेल्या प्रचार सभांमुळे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात ते जास्त वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे सध्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी उचलली आहे. प्रचारसभा, प्रचार रॅली यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सक्रिय आहेत.
अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचारसभा व महिलांचे मेळावे घेत आहेत. भाजपच्या महिला मोर्चातर्फे आयोजित करण्यात येणाऱया या मेळाव्यांमध्ये महिलांची देखील उपस्थिती देखील मोठ्या प्रमाणात आहे.