महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर - नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर

नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी पदभार स्वीकार केला. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांचा कार्यकाळ मंगळवारी 7 एप्रिलला संपुष्टात आला होता.

VC take charge of Nagpur Univesity
कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर

By

Published : Apr 8, 2020, 4:21 PM IST

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी पदभार स्वीकार केला. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांचा कार्यकाळ मंगळवारी 7 एप्रिलला संपुष्टात आला.

नागपूर विद्यापीठाचे नवे कुलगुरू पदाची निवड प्रक्रिया सुमारे दोन महिन्यांपासून सुरू होती,परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यावर ही निवड प्रक्रिया स्थगित करण्यात आली. अद्याप पूर्णवेळ कुलगुरूंची निवड न झाल्याने अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू चांदेकर यांना नागपूर विद्यापीठाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे नियमांचे पालन करीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मावळते कुलगुरू डॉ. काणे यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. चांदेकर यांच्याकडे कुलगुरूपदाची सूत्रे सोपवली.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details