नागपूर:कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी महानगरपालिकेची तयारी झालेली आहे. नागपूर शहरांमध्ये दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन प्लांट निर्माण करण्याचे काम झाले आहे. यात आयसोलेशन रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांट वगळता इतर सगळे प्लॅन्ट सुस्थितीत आहेत अशी माहितीही तिवारी यांनी दिली.
Corona in Nagpur : पालिका रुग्णलायतील सगळे बेड कोरोना बधितांसाठी राखीव - महापौर तिवारी - महापालिकेच्या रुग्णालय
नागपुरात कोरोना ( Corona in Nagpur ) तसेच ओमायक्रॉन ( Omicron variant ) बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात उपचार घेण्याऱ्याची संख्या कमी आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील 50 टक्के बेड फुल होताच महापालिकेच्या रुग्णालयाची ( Municipal Hospital ) दारे कोरोना बाधितांसाठी खुले केले जातील.अशी माहिती नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी ( Mayor Dayashankar Tiwari ) यांनी दिली.
महापौर पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर केलेल्या महत्वपूर्ण कामाचा आढावा घेताना तिवारी यांनी सांगितले की, महापालिकेत गाजत असलेल्या स्टेशनरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमली आहे, ती एक महिन्यात अहवाल सादर करणार आहे. कुठलेही स्टेशनरी साहित्य हे लोकप्रतिनिधीकडून खरेदी करण्यात आलेले नाही. स्टेशनरी साहित्य प्रशासकीय यंत्रणेकडून प्रशासकीय कामकाजासाठी खरेदी केले आहे. अहवाला नंतर भष्ट्राचार करण्याऱ्यास शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही.
यावेळी तिवारी यांनी लोकउपयोगी उपक्रमाची माहिती दिली. आरोग्य तसेच शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम केल्याचे त्यांनी सांगितले. यात शिक्षण क्षेत्रासाठी घेतलेले निर्णय असो की आरोग्य सेवेत शासकीय निधी किंवा मनपाच्या निधी खर्च नकरता सीएसआर फंडातून केल्या कामाची माहिती दिली. दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाटेत अधिक पगार देऊन वैदकीय अधिकरी नेमून जनतेला आरोग्य सुविधा पुरवू अशीही माहिती दिली.