महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 : गणेश विसर्जनासाठी सर्व तलाव बंद; मंडळांना परवानगी घेतानाचं विसर्जनाची माहिती द्यावी लागणार - सार्वजनिक गणेशोत्सव

यावर्षी गणेश विसर्जनासाठी शहरातील सर्व तलाव बंद (All lakes closed for Ganesh immersion) असणार आहेत. गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा करताना महापालिकेच्या सूचना आणि आदेशांचे पालन करावे लागणार आहे. त्यानुसार गणेशाच्या स्थापनेची परवानगी घेतानाच बाप्पाचे विसर्जन कुठे करणार या बाबत माहिती द्यावी (Mandal will have to inform while taking permission) लागणार आहे. बाप्पाच्या आगमनाला अवघे काहींचं दिवस शिल्लक आहेत. दोन वर्षानंतर गणेशोत्सवात आनंदाची मनसोक्त उधळण होणार आहे.

Ganeshotsav 2022
गणेशोत्सव २०२२

By

Published : Aug 6, 2022, 5:23 PM IST

नागपूर:या महिन्याच्या अखेरीस येणा-या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) तयारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाची नागपूर शहरातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. निर्बंध नसले तरी नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती ह्या २ फुटापेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे मोठ्या उंचीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. मात्र त्यांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने कमी उंचीच्याच गणेशमूर्तींची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा व ४ फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जनस्थळीच विसर्जीत कराव्यात, असेही आवाहन त्यांनी केले आहे.नागपूर महानगरपालिकेद्वारे यंदाही शहरातील सर्व तलाव मूर्ती विसर्जनासाठी बंद करण्यात आलेले आहेत. (All lakes closed for Ganesh immersion) त्यादृष्टीने सर्व तलावांचे योग्य बॅरिकेटींग करण्याचे निर्देश आयुक्तांनी झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.

हेही वाचा : Eco Friendly Ganesh Utsav 2022 : 'किसान विघ्नहर्ता' कोल्हापूरातील एका शाळेत साकारल्या; गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती

ABOUT THE AUTHOR

...view details