नागपूर - सर्वसामान्य कुटुंब राहात असलेल्या तरुणीने वडिलांपासून प्रेरणा घेऊन वयाच्या 14 व्या वर्षी दुग्ध व्यवसायात पाऊल ठेवले. यासाठी तिला तिच्या बहिणीचीही साथ मिळाली. या व्यवसायाचा हळूहळू अनुभव घेत आज तिने हॉटेल उद्योग क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. या माध्यमातून काही हजार रुपयांचा व्यवसाय आज कोटींच्या घरात पोहोचला आहे. पण एक महिला म्हणून हे तिच्यासाठी सोपे नव्हते. मात्र जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा यातून हे सर्वसाध्य करून दाखवले ती म्हणजे नागपूरच्या अलका दिघोरीकर या उद्योजिकीने. आज महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या या यशस्वी आणि इतर तरुणींना प्रेरणादायी ठरणाऱ्या वाटचालीचा विशेष वृत्तांत
अलका यांनी लहानपणीच उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिले होते, ही प्रेरणा त्यांना तिच्या वडिलांकडून मिळाली होती. त्या दृष्टीने अलका यांनी वयाच्या चौदाव्या वर्षीच दूध डेअरीचा व्यवसायात पाऊल टाकले. 25 ते 30 पैसे लिटरमागे मिळवत दुसरीकडे तिने शिक्षणही सुरू ठेवले. मात्र, उच्च शिक्षण तिला घेता आले नाही.
नागपूरच्या तरुण उद्योजिकेचा यशस्वी प्रवास हॉटेल इंडस्ट्रीत येईल हे ध्यानी मनी नव्हतेच-
हॉटेल व्यवसायात उतरण्यापूर्वी तिने एका कुरियर एजन्सीतही काम केले. सुरुवातीला एअर हॉस्टेस होण्याचे स्वप्न होते. ते दिल्ली सारख्या शहरात अनेक एअर्व्हेज सर्विसेस मध्ये काम मिळवत पूर्ण केले. पुढे एअरलाईन सर्विसेस मध्ये ग्राउंड होस्टेस म्हणून सात वर्षे काम केले. नॉन शेड्युल फ्लाईटसह अनेक ठिकाणी वेग वेगवेगळ्या पदावर काम केले. 'फर्स्ट व्हिजन हॉस्पिटलिटी अँड मॅनेजमेंट' हे ब्रीद घेऊन काम सुरू ठेवले. जवळपास सात वर्षाच्या अनुभवाच्या शिदोरी घेऊन हॉटेल इंडस्ट्रीत प्रवेश झाला. व्यवस्थापक पदावर दोन मोठ्या ग्रुपसोबत जोडली गेल्याने, पुन्हा 6 ते 7 वर्षे काम करत या व्यावसायिक क्षेत्राला समजून घेतले. त्यानंतर मात्र आपणच या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेऊन 2017 मध्ये हॉटेल व्यवसायाला सुरुवात केल्याची माहिती अलका दिघोरीकर यांनी दिली.
व्यवसायासाठी भांडवल आणि भाड्याने इमारत घेतली....
हॉटेल व्यवसाय सुरू करताना भांडवलही मोठ्या प्रमाणात लागणार होते. त्यासाठी सुरुवातीला बँकेतून कर्ज काढले. स्वतः जवळचे काही पैसे गोळा केले. उपलब्ध भांडवलावर स्वत:चे हॉटेल बांधने शक्य नव्हते. त्यामुळे इमारत भाडे तत्वावर घेऊन कामाला सुरुवात केली. पुढे काम वाढत गेले, व्यवसाय वाढला आणि उत्पन्नही वाढले. त्यातून त्यांनी दुसरे हॉटेल घेतले. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीने आमच्या वाटचालीमध्ये आडकाठी घातल्याचे अलका यांनी सांगितले.
पाय ओढणाऱ्यांसह कोरोनाचेही संकट
या क्षेत्रात महिला म्हणून स्पर्धेत टिकताना अनेक अडचणी सामोर आल्यात. काम करताना पाय ओढणारे मिळाले. यातून सावरत व्यवसाय रुळावर येतोच तेच कोरोनाच्या माहामारीने चक्र थांबले. आर्थिक नुकसान झाले दुसरे हॉटेल बंद पडले. कर्मचारी यासर्व स्टाफ आणि पैसे कुठून आणायचा असे अनेक प्रश्न समोर उभे राहिल. मात्र, अनुभव आणि जनसंपर्काच्या जोरावर पुढे हळूहळू उत्तर सापडल्याने यातून सावरण्याचा मार्ग निघाला, असल्याचे दिघोरीकर यांनी सांगितले.
नागपूरच्या तरुण उद्योजिकेचा यशस्वी प्रवास इतरांच्या उणिवा शोधून स्वतःची ताकद निर्माण केली-
मागील अनुभवात अनेक गोष्टी कळल्या. या क्षेत्रात फार काही शिक्षण नसतानाही लाख मोलाचा अनुभव कामी आला. मी रतन टाटा यांना आदर्श मानते. तसेच या क्षेत्रातील जाणकार पदमेश गुप्ता, सुधीर बॅनर्जी यासारख्या ज्येष्ठ व्यावसायिकांकडून आजही अनेक धडे मिळतात. त्यांच्या विचारातून उर्जा घेत कामातील उणिवा शोधल्या आणि स्वत:ची एक ताकद निर्माण करत अडचणीवर मार्ग काढला. तसेच कुणाल बावनकार सारखा विश्वासू सहकारी यासह इतर कर्मचारी या सगळ्यांच्या मदतीने हा डोलार कठीण काळातही उभा ठेवण्यात यशस्वी झालो असल्याचेही त्यांनी सांगितले.
कामावर प्रेम करण्याची कला-
अलका दिघोरीकर काम करतांना कामावर प्रेम करा असे सांगतात. पुरुषाला लाजवेल अशी उर्जा, कामाची जिद्द, वेळेप्रसंगी कामात झोकून देणे, महिला कर्मचारी यांच्या सुरक्षित काळजी सोबत कर्मचारी बॉस असे न वागता कुटुंब असल्याचे त्यांचा गुण कामाची प्रेरणा देतो.
आज 70 आहे उद्या 700 जणांना रोजगार देण्याचं स्वप्न...
सध्या दूध व्यवसायापासून सुरू झालेला प्रवास हा हॉटेल उद्योगापर्यंत येऊन पोहोचला. यात 70 लोकांना रोजगार उपलब्ध करून देता आला. भविष्यात स्वतःच्या मालकीचे हॉटेल असावे किमान 700 लोकांना जॉब देता येईल, असे काम उभे करण्यासाठी पाऊल टाकले आहे. लवकरच ते स्वप्न पूर्णत्वास जाईल अशी आशा आहे.
स्वकर्तृत्वाने ओळखून कामाला लागा....
उद्योग लहान किंवा मोठा असे काही नसते, त्यासाठी केवळ कामाशी प्रामाणिकता असावी लागते. एकदा ते जमले की यश मिळत जाते, असा सल्ला त्या देतात. आणि हेच अलका यांच्यापासून शिकण्यासारखे आहे. काम करताना कठोर परिश्रम घ्यावे. स्वतःमधील कर्तृत्व क्षमता, कौशल्य ओळखायला महिलांनी शिकले पाहिजे. हे जमले की त्या पुढील आवाहने स्वीकारून काम करा, यश नक्की मिळेल, असा संदेश अलका दिघोरीकर इतर महिलांना देऊ इच्छितात.