नागपूर : नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला ( Rains have intensified in East Vidarbha ) आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीच्या काठावर ( Banks of Pench River in Nagpur ) असलेल्या २१ गावांना सतर्कतेचा इशारा ( Alert has been Issued to 21 villages ) देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने गावांमध्ये दवंडी पिटवून नागरिकांना सतर्क केले जात आहे.
मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब : गेल्या चार दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नागपुरातील सर्वात मोठी नदी असलेल्या पेंच नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने नदीकाठच्या तब्बल २१ गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
पोलीस विभागाला सतर्कतेची सूचना : पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर पोलीस विभागसुद्धा सतर्क झाले आहे. पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचा सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे.