महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ajit Pawar on Raj Thackeray : प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार, फक्त.. राज ठाकरेंच्या सभेवर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया - अजित पवार नागपूर दौरा राज ठाकरे उल्लेख

राज्याची कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी ( Ajit Pawar on Raj Thackeray rally at Aurangabad ) आपले पोलीस सक्षम असून, त्यांना तसे निर्देशही दिले आहेत. सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, सभा घेत असताना ( Raj Thackeray Sabha at Aurangabad ) सामाजिक वातावरण खराब ( Raj Thackeray rally news Aurangabad ) होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

Ajit Pawar on Raj Thackeray
अजित पवार प्रतिक्रिया नागपूर

By

Published : Apr 30, 2022, 7:06 AM IST

नागपूर - राज्याची कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी ( Ajit Pawar on Raj Thackeray rally at Aurangabad ) आपले पोलीस सक्षम असून, त्यांना तसे निर्देशही दिले आहेत. सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, सभा घेत असताना ( Raj Thackeray Sabha at Aurangabad ) सामाजिक वातावरण खराब ( Raj Thackeray rally news Aurangabad ) होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. सभे संदर्भातले नियम पाळले पाहिजे, हे तपासूनच तिथल्या पोलीस आयुक्तांनी सभेला परवानगी दिली आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री ( Ajit Pawar on Raj Thackeray News Nagpur ) यांनी राज ठाकरे यांच्या सभेबद्दल म्हटले. ते नागपुरात माध्यमांशी विकास कामाच्या भूमीपूजनानंतर बोलत होते.

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार

हेही वाचा -Ajit Pawar Meet Nitin Gadkari : अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

निमंत्रण पत्रिका वाद - काल नागपुरात पोलीस भवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव खाली लिहण्यात आले असल्याने भाजपने कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकार येत असतात, जात असतात. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. काहींच्या काळामध्ये भूमिपूजन होतात. तर काहींच्या काळामध्ये उद्घाटन होतात. त्यामुळे, याला फारसे काही महत्त्व देण्याची गरज नासल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राला निधी मिळावा यासाठी गडकरींशी भेट -सेंट्रलरोड फंडमधून महाराष्ट्राला निधी मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो. मागच्या वर्षी बाराशे कोटींचा निधी मिळाला होता. त्यातून 600 कोटी रुपयांची कामे महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांच्या क्षेत्रात, तर उर्वरित 600 कोटींची कामे भाजप आमदारांच्या क्षेत्रात करण्याचे गडकरींनी सुचविले होते. त्यानंतर आम्ही गडकरींना भेटण्याचे ठरविले. या वर्षीही त्यांनी तशाच पद्धतीने निधी द्यावा, अशी मागणी केल्याचे अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर, रेल्वे ओव्हर ब्रिज आणि रेल्वे अंडर ब्रिज संदर्भातही गडकरींना भेटलो, असे अजित पवार यांनी सांगितले.

गॅसवरचा कर आम्ही तीन टक्के कमी केला आहे. गॅसचा दर महाराष्ट्रातील लोकांना परवडावा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. याविषयी मी काल सांगितलेले आहे. वन नेशन वन टॅक्स केंद्र सरकारने लावला, त्या धर्तीवर विचार करावा आणि जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या राज्यांच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन केंद्राचा टॅक्स किती आणि राज्याचा किती या पद्धतीने विचार करून तसा करावा, असे मतही अजित पवार यांनी मांडले.

हेही वाचा -पोलीस भवनाच्या उद्घाटनावरून रंगले नाट्य; फडणवीस यांचे नाव उपस्थितांमध्ये टाकल्याने भाजपाकडून तीव्र नाराजी

ABOUT THE AUTHOR

...view details