नागपूर - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात संविधान चौकात किसान संयुक्त मोर्च्याच्यावतीने आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधींच्या हुतात्मा दिनानिमित्त एक दिवसाचा उपवास ठेवून दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनातील पोलिसांच्या दंडुकेशाहीचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारवर टीका करत निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.
एक दिवस उपवास करत केले आंदोलन
दिल्लीत मागील दोन महिन्यांपासून आंदोलन शांततेत केले जात आहे. पण, यात 26 जानेवारीला जे झाले हे सरकारचे षडयंत्र आहे. यात जाणीवपूर्वक त्यांना परवानगी देऊन बदनाम करण्याचा घाट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनात राकेश टिकैत यांना पोलीस फोर्सने ज्या पद्धतीने आंदोलन स्थळावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे जसे ते आतंकवादी आहेत. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गांधीजींच्या हुतात्मा दिनी एक दिवस उपवास ठेवत किसान संयुक्त मोर्च्याच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. यात अनेक संघटनांनी सहभाग नोंदवला.