नागपूर - नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये दाखल कोरोनाबाधित रुग्ण दिलीप कडेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दिलीप कडेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत १३ मे रोजी माजी महापौर संदीप जोशी यांनी मृताच्या मुलासह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणात पाचपावली पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने आज पुन्हा संदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली पाचपावली पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन करण्यात आले.
रुग्णालय प्रशासनावर खुनाचा गुन्हा दाखल करा, माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन - नागपुरात माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात आंदोलन
नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात पाचपावली पोलीस स्टेशन समोर झालेल्या धरणे आंदोलनात कडेकर कुटुंबीय ही सहभागी झाले होते. रुग्णालय प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केल्याच्या अनेक दिवसानंतरही पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नाहीत असा आरोप या आंदोलना दरम्यान करण्यात आला.
नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात पाचपावली पोलीस स्टेशन समोर झालेल्या धरणे आंदोलनात कडेकर कुटुंबीय ही सहभागी झाले होते. रुग्णालय प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केल्याच्या अनेक दिवसानंतरही पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नाहीत असा आरोप या आंदोलना दरम्यान करण्यात आला. लेखी तक्रार दिल्याच्या १८ दिवसानंतरही पोलीस तपासाच्या नावावर एक पाऊलही पुढे टाकत नसतील तर आमच्यासमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असे संदीप जोशी म्हणाले.