नागपूर -अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कोरोनामुळे बंद असलेले महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. नागपूर महापालिका क्षेत्रातील 5 महाविद्यालयांसमोर अभाविपच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
कोरोनामुळे मागील ११ महिन्यांपासून राज्यातील सर्व महाविद्यालये बंद आहेत. लॉकडाऊन काळात बंद असलेल्या शाळा, मॉल, दारूची दुकाने, आणि इतर अनेक गोष्टी सुरू करायला सरकारने परवानगी दिली. मग महाविद्यालये अद्याप बंद का ठेवण्यात आली आहेत, असा सवाल उपस्थित करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातील विविध महाविद्यालयांसमोर आज आंदोलन करण्यात आले.