नागपूर :एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर( After The Revolt of Eknath Shinde ) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले ( Political Atmosphere Heated up Well ) आहे. राज्यात चांगलीच उलथापालथ झाल्याचे दिसून आले आहे. यातच बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याने आता बंडखोर आमदारांविरोधा शिवसेनेचे निषेध मोर्चे( Shiv Sena on Action Mode )निघत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नागपूर रामटेक येथील शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार आशिष जयस्वाल ( Independent MLA Ashish Jaiswal ) यांच्याविरोधात शिवसेने निषेध मोर्चा काढला.
आशिष जयस्वाल यांनी अगोदर कल्पना द्यायला पाहिजे : निषेध मोर्चावेळी माजी खासदार प्रकाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यांनी निवडणूक लढताना कार्यकर्त्याचे श्रम घ्यायचे आणि अचानक बंडखोरी करून निघून जायचे ही त्यांची खासगी संपत्ती नाही, तर आमदारकीही शिवसेनेची संपत्ती आहे. त्यामुळे कोणत्याही शिवसनेच्या कार्यकर्त्याशी चर्चा न करता निघून गेलेले आमदार नेमके कोणत्या प्रलोभनाला बळी पडले. माध्यमांवर चर्चा आहे त्या पद्धतीने 50 ते 55 कोटीत विकले तर गेले नाही ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पक्षाने नेहमीच सन्मान दिला :आशिष जयस्वाल हे रामटेक विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा निवडून आले आहेत. जरी पक्षाने त्यांना मंत्रिपद दिले नाही. पण, त्यांनी नाराजी बोलून दाखवल्याने मानसन्माम केला. त्यांना खनिकर्ममंडळाचे अध्यक्षपदही दिले. तरीसुद्धा असे काय दुःख होते आमदार जयस्वाल यांनी अचानक बंडखोरी करीत निघून गेले. शिवसेना पक्षाने कधी स्पर्धा करून अडचणी निर्माण केल्या नाहीत. कारण पक्षाचा आमदार सुरक्षित राहावा म्हणून. पण निवडणुक लढताना पक्षातील पदाधिकरी यांना विचारत घेऊन काम करायचे असते. आता मात्र जाताना कोणालाही विचारले नाही, एकट्यानेच निर्णय घेऊन निघून जाण्यामागे नेमके काय कारण आहे. काही अर्थकारण तर नाही ना अशीही चर्चा आहे. पण शिवसेना या पद्धतीची बेईमानी खपवून घेणार नाही, असा इशारासुद्धा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी आमदार आशिष जयस्वाल यांना या विरोध प्रदर्शनाच्या माध्यमातून दिला.