महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात राणेंच्या अटकेनंतर शिवसैनिकांकडून जल्लोष, तर भाजपाकडून अटकेचा निषेध

नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर नागपूर शहरातील मानेवाडा परिसरात सेनेकडून ढोलताशा वाजत जल्लोष करण्यात आला. तर भाजपाकडून अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाल परिसरात पुतळ्याचे दहन करत अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

जल्लोष
जल्लोष

By

Published : Aug 25, 2021, 3:04 AM IST

Updated : Aug 25, 2021, 3:21 AM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात आंदोलन झाले. यात नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर नागपूर शहरातील मानेवाडा परिसरात शिवसेनेकडून ढोलताशा वाजत जल्लोष करण्यात आला. तर भाजपाकडून अटकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाल परिसरात पुतळ्याचे दहन करत अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

नागपुरात राणेंच्या अटकेनंतर शिवसैनिकांकडून जल्लोष

जल्लोष आणि निषेध

राणेंनी महाड येथे केलेल्या वक्तव्यावर राज्यभरात वातावरण चांगलेच तापले होते. नारायण राणे यांना अटक होताच अटकेनंतर नागपुरात शिवसैनिक मानेवाडा चौकात एकत्र आले. यावेळी राणे यांच्याबद्दलचे फलक हातात घेऊन ढोल ताशाच्या तालावर जल्लोष सुरू केला आहे. यावेळी एकमेकांना पेढे भरवत आणि नारायण राणे व भाजपा विरोधात घोषणा देत शिवसैनिकांनी जल्लोष केला. दुसरीकडे नागपूर शहरात भाजपाकडून सुद्धा अटकेच्या करवाईचा निषेध करण्यात आला. नागपूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी टिळक पुतळा परिसरात नारायण राणे यांच्या अटकेसंदर्भात निषेध आंदोलन केले. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात निषेध असे फलक हातात घेण्यात आले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. मात्र काही वेळातच पोलिसांना पुतळा विझवला.

हेही वाचा -जाणून घ्या, नारायण राणे संदर्भात आज दिवसभरात नेमके काय घडले

Last Updated : Aug 25, 2021, 3:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details