नागपूर - संधी मिळाल्यास राजकारण सोडून समाजसेवा करायला आवडेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ते 'एक पहल अभिनव गाव की ओर' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला जेष्ठ सिने कलाकार नाना पाटेकर हे देखील उपस्थित होते. चिटणीस सेंटरमध्ये आयोजित 'एक पहल अभिनव गाव की ओर' या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची विस्तृत मुलाखत झाली, ज्यामध्ये बोलताना दोघांनीही आपल्या-आपल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले.
हेही वाचा - अमरावतीच्या सायकल मॅरेथॉनमध्ये खासदार नवनीत राणांनी चालवली सायकल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणासोबतच समाजकारण आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत. समाज जिवनात वावरतांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत असल्याचे ते सांगत असतात. दरम्यान, नागपूरच्या चिटणीस सेंटरमध्ये 'एक पहल अभिनव गाव की ओर' या कार्यक्रमात बोलताना देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वाक्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, 'मला संधी मिळाल्यास राजकारण सोडून समाजसेवा करायला नक्की आवडेल'.