नागपुरात आठ दिवसांच्या निर्बंधानंतर नियम व अटींसह आस्थापने सुरू
सलग आठ दिवस उपराजधानी नागपुरात संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यानंतर आजपासून प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या नियमात काही अटी-शर्तींसह सूट देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी शहरातील लहान मोठी आस्थापने सुरू झाली आहेत, तर तब्बल आठ दिवसांनंतर नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसून आले.
नागपुरातील आस्थापने नियम व अटींसह सुरू
नागपूर -सलग आठ दिवस उपराजधानी नागपुरात संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यानंतर आजपासून प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या नियमात काही अटी शर्तींसह सूट देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी शहरातील लहान मोठी आस्थापने सुरू झाली आहेत, तर तब्बल आठ दिवसांनंतर नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसून आले. नियम शिथिल झाल्यामुळे अचानक रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे पुन्हा शहरात कोरोनाला पोषक वातावरण मिळत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे.
..हे बंद राहणार -
शहरातील सर्व धार्मिक स्थळे आजपासून बंद ठेण्यात आली आहेत. मात्र नियमित पूजेसाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे तर लग्न समारंभावर बंधने कायम ठेवण्यात आली आहेत. याच बरोबर शहरातील उद्याने, शाळा महाविद्यालये, शिकावणी वर्ग, आठवडी बाजार, जलतरण केंद्र, व्यायाम शाळा आणि मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा -अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
..हे सुरू राहणार -
अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व आस्थापणे नियमित सुरू राहणार आहेत. किराणा दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर रेस्टॉरंट, हॉटेल्स, खाद्यगृहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दूध दुकानांना देखील सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. दुचाकीवर दोघांना प्रवास करता येणार आहे.
Last Updated : Mar 22, 2021, 7:59 PM IST