नागपूर -आजचा हिंदू समाज हा सडका असल्याचे वक्तव्य काल पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी यांने केले आहे. या संदर्भात हिंदू संघटनांसह भारतीय जनता पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवला. दरम्यान, आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ मागवले आहेत. त्या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर शर्जील उस्मानी वर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
व्हिडीओ तपासल्यानंतर शर्जील उस्मानी वर कारवाई करू- गृहमंत्री - nagpur news
आजचा हिंदू समाज हा सडका असल्याचे वक्तव्य काल पुण्यात झालेल्या एलगार परिषदेत शर्जील उस्मानी यांने केले आहे.
हिंदू समाजावर टीका-
एल्गार परिषदेत बोलताना शर्जील उस्मानीने आजचा हिंदू समाज सडक्या मानसिकतेचा असल्याचं वक्तव्य केले आहे. 14 वर्षीय मोहम्मद जुनेद नावाच्या चिमुकल्यांचा सर्वांच्या समोर निर्घृण खून करण्यात आला होता. त्यावेळी कुणीही पुढे येऊन निषेध नोंदवला नसल्याचं म्हणत त्याकरिता हिंदू समाजावर टीका उस्मानीने केली आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर हिंदू समाजाकडून जोरदार निषेध नोंदवण्यात आला आहे. यासंदर्भात आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले असता. ते म्हणाले की कालच्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ मागवलेले आहेत. ते तपासून झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.
दोन वर्षानंतर एल्गार परिषदेचे आयोजन-
वादग्रस्त वक्तव्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकारने एल्गार परिषदेच्या आयोजनाला परवानगी नाकारली होती. यावर्षी ३१ डिसेंबरला देखील एल्गार परिषदेची परवानगी मागण्यात आली होती. मात्र यावर्षी ३१ जानेवारीला एल्गार परिषदेची परवानगी राज्य सरकारने दिल्यानंतर काल पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शर्जील उस्मानी याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
हेही वाचा-महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही नाही, निवडणूक असलेल्या राज्यांसाठी हात सैल - भुजबळ