नागपूर - शिवसेना पक्ष नेमका कुणाचा? या प्रश्नाचे उत्तर उभ्या महाराष्ट्राला हवे आहे. हा पेच कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे, त्यामुळे यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे मत जाणून घेतले. यावर शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे यांचाच दावा मजबूत असल्याचे त्यांनी ( Ujjwal Nikam on maharashtra government ) सांगितले. या शिवाय बंडखोर आमदार आपला गट दुसऱ्या पक्षात विलीन करतील ही देखील शक्यता ( Ujjwal Nikam latest news ) फार कमी असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा -Atul Londhe : राज्यपाल या संस्थेचा असंवैधानिक दुरुपयोग - अतुल लोंढे
आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंडाळीचा सामना शिवसेना पक्ष करत आहे. तब्बल 40 आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांना नाईलाजाने मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर देखील अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामध्ये शिवसेनेतील बंडाळीनंतर शिवसेना पक्ष कुणाचा? यावरून नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे बंडखोर आमदारांच्या गटाकडे दोन तृतीयांश आमदार असल्याने आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे उत्तराधिकारी आहोत, असा दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे भविष्य असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे.