नागपूर - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज मंगळवारी नागपुरात दाखल झाली. या यात्रेचे शहरातील लोकमत चौकात, शहर सेने तर्फे स्वागत करण्यात आले.
आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा मुख्यमंत्र्यांच्या शहरात - aditya thackeray in nagpur
लोकसभा निवडणूकीत लोकांनी शिवसेनेला केलेल्या मतदानासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि आशिर्वाद घेण्यासाठी शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा आज नागपूरात दाखल झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत लोकांनी शिवसेनेला केलेल्या मतदानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ही यात्रा काढली आहे. दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी शिवेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी जनआशीर्वाद यात्रे सोबत शहरात बाइक रॅली काढली. यावेळी प्रथम लोकमत चौकात आणि त्यानंतर बजाज नगर, माटे चौक आणि हिंगणा टी पॉईंट वर त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर आदित्य ठाकरेंनी हिंगण्यातील एका महाविद्यालयात 'युवा संवादा' अंतर्गत विद्यार्थांशी संवाद साधला.