महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत बसून अभिनेता सोनू सूदला जे जमते, ते स्थानिक नेत्यांना का नाही? - रुग्णाला केली बेडची मदत

भंडारा जिल्ह्यातील मजुराच्या मुलाने ट्विट करून मदतीचे आव्हान केले होते. परंतु, कोणीही समोर आले नाही. मात्र मुंबईत बसून सोनू सूदने मदत केली. मुंबईत बसून अभिनेता सोनू सूदला जे जमते, ते स्थानिक नेत्यांना का नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मुंबईत बसून सोनू सूद करताय गरजूंची मदत
मुंबईत बसून सोनू सूद करताय गरजूंची मदत

By

Published : Apr 22, 2021, 11:02 AM IST

नागपूर- नागपूरात दररोज कोरोनाची परिस्थिती पाहता विदारक चित्र निर्माण होत चालले आहे. यात भंडारा जिल्ह्यातील एका मजुराला कोविड पॉझिटिव्ह असताना दवाखान्याची भटकंती करूनही बेड मिळत नव्हता. तर दुसरीकडे रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती. यात ट्विटरवर अभिनेता सोनू सूदला मदत मागितली. त्याने 15 मिनिटात बेड मिळेल असे सांगितले आणि अवघ्या काही वेळातच बेड उपलब्ध झाला. या सर्वात मुंबईत बसून, एका गरीब मजुरांसाठी सोनू सूदने जे केले, ते इतर राजकीय नेत्यांना जमणार का? हा प्रश्न पुढे येतोय.

ट्विट करून केले होते मदतीचे आव्हान

भंडारा जिल्ह्यातील मजुराच्या मुलाने ट्विट करून मदतीचे आव्हान केले. यावर काही वेळातच मेयो हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला बेड उपलब्ध झाला. नागपूरात आजच्या घडीला 7244 बेडवर रुग्ण उपचार घेत आहे. पण दररोज इतकेच किंवा यापेक्षा जास्त रुग्ण दररोज नव्याने बाधित होत आहे. यात 71 हजारच्या वर रुग्ण सक्रिय असून त्यांना उपचार मिळणे कठीण झाले आहे.

ट्विटवर उत्तर देताना सोनू सूद म्हणतात की

दुसऱ्या लाटेतही मदतीचा हात

अभिनेता सोनू सूद हे पहिल्या लाटेतही मजुरांच्या मदतीसाठी धावून गेले होते. दुसऱ्या लाटेतील परिस्थिती अधिक कठीण होत चालली असतांना, सोनू सूद अनेकांना मदतीचा हात देतांना दिसून येत आहे. नागपूरात उपचार घेणाऱ्या रुग्णाला बेड मिळताच उपचार सुरू झाला असल्याने त्या रुग्णाच्या मुलाने आभार मानले. सोनू सूदला मदत मागण्यापूर्वी काही राजकीय मंडळींना सुद्धा मदत मागितली, परंतु मदतीसाठी कोणीच धावले नाही.

'कोशीष जारी है'

सध्या सोनू सूदच्या ट्विटर हँडलवर मदत मागण्यांसाठी अनेक ट्विट पडतांना दिसून येत आहे. तसेच काम होताच लोक आभार सुद्धा मानत आहे. पण नागरपूरच्या रुग्णाच्या आभार ट्विटवर उत्तर देताना सोनू सूद म्हणतात की, "बात तो तब है जब देश मे हर जरूरतमंद को बेड मिल जाए। कोशीष जारी है"

हेही वाचा -Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या!

ABOUT THE AUTHOR

...view details