नागपूर -नितेश राणे यांच्यावर सुडाच्या भावनेतून कारवाई केली जात आहे. जिल्हा परिषद निवडणून आपण हरणार आहोत हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी राजकारण सुरू केले आहे असा आरोप केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
सूडाच्या भावनेतून कारवाई होईल तर न्यायालयात जावच लागले
सध्या सर्व सुडाच्या भावनेतून राजकारणातून अश्या बातम्या पेरल्या जात आहे. दरम्यान, नितेश राणे कुठे अज्ञातवासात गेलेले नसून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. आणि आम्हाला अज्ञातवासात जायची गरज नाही असही राणे यावेळी म्हणाले आहेत. गरज पडली तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि अशा पद्धतीने सूडाच्या भावनेतून कारवाई होईल तर न्यायालयात जावच लागले असही राणे म्हणाले आहेत.
विदर्भातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेल
ओबीसीच्या अरक्षणासंदर्भात कुठलीही भविष्यवाणी करणे योग्य नाही. त्याबाबत निर्णय झाल्यानंतर त्यावर सविस्तर बोलता येईल आता मी काही त्यावर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली नाही. यानंतर ही पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर येईल विदर्भातील आणि राज्याचे उत्पन्न वाढीसाठी तसेच रोजगार उत्पन्नासाठी जे काही करता येईल ते करील. अनेक योजनांच्या माध्यमातून विदर्भातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करेल असही राणे यावेळी म्हणाले आहेत.
परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांना कणकवलीत नुकतीच मारहाण झाली. या मारहाण प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Compalaint Against Nitesh Rane ) यांचे नाव घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना चौकशीसाठी हजर राहावे यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण (Shivsena vs Nitesh Rane) चांगलेच तापले आहे. शनिवार (दि. 18 डिसेंबर)रोजी परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर या प्रकरणी आरोप केले होते.
अज्ञातांनी केला हल्ला
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले आहेत. संतोष परब Shivsena Activist Santosh Parab) यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Shivsena Activist file Compalaint Against Nitesh Rane) संतोष परब हे मोटरसायकलवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. त्यानंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकूने छातीवर वार केले. या हल्ल्यात परब जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत; सतीश सावंत यांचा आरोप
जिल्हा बँक निवडणुकीतील माझे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा आमदार नितेश राणे, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या भाडोत्री गुंडांनी केल्याचे सांगत या हल्ल्याचे सूत्रधार आमदार नितेश राणे, गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा बँक निवडणूक पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांनी केला. जिल्हा बँक निवडणुक दहशतवादाने जिंकण्याचा राणेंचा डाव असल्याचेही सावंत म्हणाले आहेत. 2015 साली राणेंची साथ सोडणाऱ्या राजन तेलींवर अशाच प्रकारे सावंतवाडी रेस्ट हाऊसमध्ये हल्ला झाला होता. सहकार क्षेत्रात खुनी हल्ले करून दशतवादाने जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा राणेंचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील जनता राणेंच्या या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देईल, असे सावंत म्हणाले होते.
हेही वाचा -भाजपच्या देणगी मोहिमेचा देश बलाढ्य होण्याशी काडीमात्र संबंध नाही, सामना अग्रलेखातून प्रहार