महाराष्ट्र

maharashtra

अनिल देशमुखांवरील कारवाई संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By

Published : Jun 25, 2021, 5:12 PM IST

अनिल देशमुखांवरील कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने निर्देशाप्रमाणे सुरु आहे. याचा कुठलाही चुकीचा अर्थ काढण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ed raid on anil deshmukhs house
अनिल देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणेच - देवेंद्र फडणवीस

नागपूर- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जी काही कारवाई झालेली आहे, ती मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशित केल्याप्रमाणे चाललेली आहे. याचा कुठलाही चुकीचा अर्थ काढण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच सीबीआय एखादा छापा टाकते, तेव्हा लोकल पोलिसांपेक्षा सीआरपीएफ त्यांच्या सोबत असते. हा प्रोटोकॉल आहे. मी त्यांचा प्रवक्ता नाही, त्यामुळे यावर फार काही बोलता येणार नाही, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया

हेही वाचा -ट्विटरकडून रवीशंकर प्रसाद यांचे अकाउंट तात्पुरते बंद; केंद्रीय मंत्र्यांनी 'हा' केला आरोप

संजय राऊतांना टोला -

संजय राऊत यांना राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे, ते वेळो वेळी वाजवत असतात, असा खोचक टोलाही फडणवीस यांनी लगावला. तसेच संजय राऊत केवळ तोंडाची वाफ उडवतात, असेही ते म्हणाले. अयोध्येच्या संदर्भातील लढाई लढणारे आम्ही आहोत. आयोध्येच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिलेला आहे. त्यामुळे आज आयोध्येमध्ये राम मंदिर तयार होत आहे. यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे, ते आज त्यांच्या ओठावर येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

सुप्रिया सुळे यांना सुनावले खडे बोल -

'सुप्रिया सुळे यांनी आणीबाणी बघितली नाही. त्या लहान होत्या, मी देखील लहान होतो. कुठलाही आरोप नसताना २१ महिने माझे वडील जेल मध्ये होते. जॉर्ज फर्नांडिस सारख्या व्यक्तीला बर्फावर झोपण्यात आले होते. तुम्हाला काय माहिती आहे की आणीबाणी म्हणजे काय?' अशी प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे यांनादेखील फडणवीसांनी खडे बोल सुनावले आहे.

हेही वाचा -भाजपासारख्या पक्षाने सुडाचे राजकारण करणं दुर्दैवी - खासदार सुप्रिया सुळे

ABOUT THE AUTHOR

...view details