महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्राध्यापक साईबाबांची निर्दोष सुटका, हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक- देवेंद्र फडणवीस - Delhi University Professor

Devendra Fadnavis: माओवाद्यांसोबत संबंध असल्याच्या आरोपात अटक झालेले दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक साईबाबाची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की साईबाबा संदर्भातील निर्णय टेक्निकल ग्राउंड वर झालेला आहे. खरं म्हणजे आजचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. विशेषता जे पोलीस नक्षलवाद्यांशी लढताना आपला जीव गमवातात.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : Oct 14, 2022, 10:56 PM IST

नागपूर:माओवाद्यांसोबत संबंध असल्याच्या आरोपात अटक झालेले दिल्ली युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक Delhi University Professor साईबाबाची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Home Minister Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की साईबाबा संदर्भातील निर्णय टेक्निकल ग्राउंड वर झालेला आहे. खरं म्हणजे आजचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. विशेषता जे पोलीस नक्षलवाद्यांशी लढताना आपला जीव गमवातात.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

न्याय मिळवण्याचा प्रयत्न करूया निकालाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे. ज्या व्यक्तीविरुद्ध एवढे पुरावे आहेत. त्याला सोडून देणे हा शहिदांवर अन्यायकारक ठरेल. त्यामुळे आम्ही हे सगळं सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे मांडू आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

अखेर 5 वर्षांनी आम्हाला न्याय मिळाला प्राध्यापक साईबाबासह इतरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हा निर्णय ऐतिहासिक आहे. 5 वर्षांनी आम्हाला न्याय मिळला आहे. दिल्ली विद्यपीठाचे प्राध्यापक साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर नक्षली कटाचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये इलेक्ट्रॉनिक एविडन्स पोलिसांनी दिले होते. मात्र, न्यायालयाने ते ग्राह्य धरले नाहीत.

भीमा कोरेगाव प्रकरणा न्याय मिळेल आजच्या निकालाचा फायदा भीमा कोरेगाव प्रकरणातही होणार असल्याचं मत प्राध्यापक साईबाबाचे वकील आकाश सरोदे यांनी व्यक्त केलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणा आम्हाला न्याय मिळेल असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

पुणे घेटनेतील दोषींवर कारवाई होईल पुण्यातील मुलीला फरफटत नेण्याची घटना ही गंभीर आहे. आरोपीवर कारवाई केली जाईल. मात्र सगळे ऑटो रिक्षावाल्यांना दोषी मनाने योग्य होणार नाही. चूक केली असेल त्याच्यावर कारवाई होईलचं असे ते यावेळी म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details