नागपूर -दोन दिवसांपूर्वी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली पुलावर मिरची व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून २० लाख रुपये लुटल्याची ( Chilli trader's employee beaten up and robbed ) घटना घडली होती. या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिरची व्यापाऱ्याचा कर्मचारीच आरोपी ( Employee of the chilli trader is the accused ) असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसायात नुकसान झाल्याने प्रचंड आर्थिक तंगी निर्माण होती. त्यातून सुटका होण्यासाठी आरोपीने मालकाचे २० लाख रुपये अज्ञात आरोपींनी लुटल्याचा बनवा केला होता. आरोपीने सर्व प्लॅनिंग ही क्राईम वेब सिरीज बघून ( Robbery by watching crime web series ) केल्याचे देखील तपासात उघड झाले आहे.
क्राईम वेब सिरीज बघून रचला प्लॅन-लॉकडाऊनच्या रिकाम्या वेळेत दिवस-रात्र गुन्हे आणि गुन्हेगारी या विषयांवरच आधारित वेब सीरिज पाहणाऱ्या एका इसमाने वेब सिरीज पासून प्रेरणा घेत चक्क स्वतःच्या मालकालाच २० लाख रुपयांनी गंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो पोलिसांच्या हाती लागतोचं हे बघणं मात्र आरोपी विसरला असावा. म्हणून तो आज थेट पोलिसांच्या लॉकअपमध्ये पोहचला आहे. ही घटना नागपूर शहरामध्ये घडली आहे.