नागपूर :-शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाची इसमाची झोपेतच हत्या झाली आहे. सोनू बनकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे,तो कळमना मार्केट भागात मोलमजुरी करायचा. रात्री फुटपाथवर झोपण्याच्या जागेवरून उद्भवलेल्या वादातून एकाने त्याच्या डोक्यात दगड मारून हत्या केली आहे. पारडी पोलिसांनी या प्रकरणी दामोदर उर्फ दामू नामक आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Nagpur Crime : झोपण्याच्या जागेवरून उद्भवलेल्या वादातून एकाची हत्या, आरोपी अटकेत - नागरिक क्राईम न्यूज
सोनू बनकर हा दिवसभर मोलमजुरी करायचा. त्याचे दामोदरशी झोपण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला. मात्र, रात्री आरोपीने रस्त्यावर पडलेली वीट सोनूच्या डोक्यात मारून घटनास्थळावरून पळ काढला. यात सोनूचा जागीच मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू बनकर हा दिवसभर मोलमजुरी करायचा. त्यानंतर पारडी भागातील एका फार्मसीसमोर तो झोपत असे. काल रात्री सुद्धा नित्यनेमाने तो त्याच्या ठराविक जागी झोपला होता. तर दामोदर उर्फ दामू हा इसम देखील तिथे झोपण्यासाठी आला असता दोघांमध्ये फुटपाथवर झोपण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला. मात्र, रात्री दामोदर उर्फ दामू हा तिथून निघून गेल्याने हा वाद मिटला होता. पहाटेच्या सुमारास तो परत त्याच ठिकाणी आला. तेव्हा सोनू तिथेच झोपला होता. आरोपीने रस्त्यावर पडलेली वीट सोनूच्या डोक्यात मारून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती समजताच पारडी पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सोनूचा जागीच मृत्यू झाला होता.
सीसीटीव्हीत दिसला आरोपी:-
पारडी पोलिसांनी सोनूचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठवल्यानंतर त्यांनी तपासाला सुरुवात केली. सर्वात आधी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सुरुवात केली. एका फुटेज मध्ये आरोपी दामू दिसून आला,त्याआधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा -सातारा पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातून टोळीच्या आवळल्या मुसक्या, तीन गुन्हे उघडकीस