नागपूर -अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 66वे अधिवेशन नागपुरात होऊ घातले आहे. हे दोन दिवसीय अधिवेशन डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर रेशीमबाग येथे 25 आणि 26 डिसेंबरला होणार आहे. या अधिवेशनात देशभरातील विविध प्रांताचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. पण यात केवळ केंद्रीय समितीचे प्रत्यक्ष 80 पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
80 जण सहभागी होणार
66 वे राष्ट्रीय अधिवेशार कोरोनाचे सावट असल्याने यात केवळ प्रत्यक्ष नागपुरात 80 जण सहभागी होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यात दुसऱ्या दिवशी सन्मान सोहळा असणार आहे. यात बिहार राज्यातील मनीष कुमार यांना एबीव्हीपीचा मानाचा समजला जाणारा प्रा. यशवंतराव केळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. युवकांसाठी आणि कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा सन्मान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून यात एक लाख रोख आणि सन्मानचिन्ह दिले जाणार असल्याचे राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी यांनी दिली.